write.as

जिल्हकयातील सफाई कामगारांना घरे उपलब्ध करणार – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्हयातील सफाई कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करण्यात येतील, दलित वस्त्यांमध्ये रस्त्यांची कामे मंजूर करण्यात येतील, उत्तम पेयजल व्यवस्था करण्यात येईल तसेच टाटा ट्रस्ट च्या सहाय्याने उभारण्यात येणा-या कॅन्सर हॉस्पीटल च्या माध्यमातुन कर्करोग तपासणी करण्यात येईल, अशी ग्वाही अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दिनांक 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आयोजित बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सफाई कामगारांना आश्वस्त केले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हयातील सफाई कामगारांच्या मागण्यांबाबत बैठक बोलाविली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषदा व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील सर्व मनपा, नगर परिषदा, नगर पंचायती कामगार व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला, या निर्णयाचा लाभ सेवानिवृत्तांना सुध्दा होणार आहे. सफाई कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येईल तसेच कॅन्सर हॉस्पीटल च्या माध्यमातुन कॅन्सरची तपासणी करण्यात येईल. सफाई कामगारांना साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतची बाब तपासून याबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल. लाड-पागे समिती च्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना यावेळी दिल्या. यावेळी फेम इंडिया या मॅग्जींन च्या माध्यमातुन देशातील सर्वश्रेष्ठ मंत्री म्हणून गौरव करण्यात आल्याबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीला म्हाडाचे सभापती तारिकभाई, आ. संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भिमनवार, सफाई कर्मचारी संघटनेचे श्री. रेवते व अन्य पदाधिका-यांची उपस्थिती होती. सफाई कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याबद्दल श्री. रेवते व अन्य पदाधिका-यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com