write.as

ऊर्जा निर्माण करणाऱ्या जिल्ह्याला देशात अव्वल बनवा: ना.सुधीर मुनगंटीवार/ ऊर्जानगर वसाहतीमधील शंभर कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन चंद्रपूर, दि. 26 जुलै: चंद्रपूर जिल्हा मिशन शौर्य, मिशन शक्ती, मिशन सेवा, सैनिकी शाळा, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातून विकसित जिल्ह्याकडे अग्रेसर होत आहे. हजारो मेगावॅट ऊर्जेची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातून होत असून या ऊर्जा निर्मिती करणाऱ्या जिल्ह्याला देशातून प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे अर्थ, नियोजन वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 26 जुलै रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रद्वारा कलामंदिर येथे आयोजित ऊर्जानगर वसाहत नूतनीकरण व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. ऊर्जानगर वसाहतीच्या संदर्भातील विविध विकास कामांचे निविदा निघालेल्या आहेत. ऊर्जा खात्याचा मंत्री नसतानाही ऊर्जा विभागाला राज्याचा अर्थमंत्री या नात्याने भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे देशाला अभिमान वाटावा असे केंद्र असून केंद्राच्या माध्यमातून तसेच या वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे गरिबांच्या अंधकारमय घरात प्रकाश पोहोचवता येतो. हे ईश्वरीय कार्य असल्याने ऊर्जानगर वसाहतीच्या विकासासाठी निधी कमी पडू न देता पुन्हा 100 कोटी रुपयाची तरतूद करेल. वसाहतीतील महिलांच्या मागणीनुसार आमदार निधीमधून ओपन जिमची निर्मिती करणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संचालक मंडळाचे अध्यक्ष रामपाल सिंह, श्री घुगे, जिल्हा परिषद सदस्या वनिता आसुटकर, पंचायत समिती सदस्य हेमा रायपुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास टेंभुरणे, प्रमोद कडू व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते. पाण्याचा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण होत असून चंद्रपूर शहरातील वापर केलेले दूषित पाणी औष्णिक विद्युत केंद्राने वापरावे आणि इरई धरणाचे पाणी चंद्रपूर शहरातील लोकांना पिण्यासाठी वापरू द्यावे. या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा सदुपयोग करता येईल, तसेच ऊर्जानगर वसाहतीमध्ये असणाऱ्या खुल्या जागेमध्ये हिरवाई निर्माण करण्यासाठी येथील कर्मचारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संस्थांनी पुढाकार घेऊन वृक्षसंपत्ती निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये सहज भाव निर्माण करावा व धनापेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या वनसंपत्तीचे संरक्षण करावे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात विविध कामे सुरू असून देशात उत्कृष्ट असणारी सैनिकी शाळा पूर्णत्वास येत असून त्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. येत्या 4 ऑगस्टला मिशन शक्ती या अभियानाची सुरुवात करण्यात येत असून या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान उपस्थित राहणार आहे. 712 जिल्हे असणाऱ्या देशात 4926आयएएस अधिकारी कार्यरत असून भविष्यातील अधिकारी चंद्रपूर जिल्ह्यातून निर्माण व्हावेत. याकरिता मिशन सेवा हे अभियान सुरू असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील ई लायब्ररी निर्माण करण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्याला स्पर्धा परीक्षेच्या केंद्राचे स्वरूप येत आहे. जिल्ह्यात बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेची कमतरता नसून देशपातळीवरील आयआयटी परीक्षेत बल्लारपूर येथील विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. तसेच चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकांनी स्वच्छतेमध्ये देशातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. देशातील सर्वात उत्कृष्ट सैनिकी शाळा जिल्ह्यांमध्ये निर्माण होत असून भविष्यात भारतीय सैन्यदलातील मुख्य अधिकारी हे चंद्रपूरच्या भूमीतून शिक्षण घेऊन जातील व चंद्रपूरचा नावलौकिक देशपातळीवर गातील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यात वनअकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बांबू हस्तकला केंद्र, कुकुटपालन, खादीचे कपडे बनवण्याकरता सोलर चरखे वाटप, शिलाई मशीन प्रशिक्षण, विविध पाणी सिंचन योजना अशी विविध विकास कामे झालेली आहेत. सोबतच ऑस्ट्रेलिया येथील कंपनीशी करार करून जिल्ह्यात बांबूपासून डिझेल बनवण्याच्या सर्वात मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करण्याचा मानस असून या प्रकल्पामुळे परिवहन महामंडळाला स्वस्त दरात डिझेल उपलब्ध होणार आहे, अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली. *केसरी नंदन नगर येथील 50 लक्ष रुपयाच्या कामाचे भूमिपूजन* या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आरओ पाण्याच्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याप्रसंगी येथील मोकळ्या जागेत सौंदर्यीकरण व नालीचे बांधकाम यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती. या कामात कोणताही विलंब न करता तात्काळ निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. हा भाग श्रम करणाऱ्या कामगारांचा असून त्यांना शिधापत्रिका काढण्याकरिता वेळ मिळत नाही. म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन तहसील कार्यालयाच्या मदतीने शिधापत्रिका काढण्याकरिता शिबिर आयोजित करावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जाती-धर्माचा विचार न करिता आपला माणूस म्हणून जनतेची सेवा करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहो. श्रीमंतांची मुले महागड्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला टाकतात परंतु याची खंत गरिबाला वाटू नये, याकरिता प्रत्येक क्षेत्रातील अंगणवाड्या आयएसओ करण्याकडे वाटचाल सुरू आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. *नेरी काँक्रीट रोडसाठी 40 तर नाल्याच्या संरक्षण भिंतीसाठी 80 लाख* ऊर्जानगर नेरी या भागात असलेल्या नाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन येथील नागरिकांना नाहक त्रास होत होता. नाल्याला संरक्षक भिंत बांधण्याकरिता विरोधी पक्षाचा आमदार असतानाच प्रयत्न सुरू होते. आता सत्ता प्राप्त होताच याकरिता निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या वार्डामध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकरांची छोटी मूर्ती होती. परंतु बाबासाहेबांच्या कार्याचा सन्मान करण्याकरिता त्यांचा मोठा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडताना समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला असून विधवा ,निराधार, परितक्त्या व ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनात वाढ केलेली आहे. महिलांना न्याय देण्यासाठी व त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक सुदृढीकरण करण्याकरिता 500 कोटीची योजना तयार करण्यात आलेली आहे. आपल्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला 2 व 3 रुपये किलो अन्नधान्य उपलब्ध व्हावे, याकरिता 100% शिधापत्रिका वाटप कार्यक्रम सुरू करण्यात आला असून त्याचा जनतेने लाभ घ्यावा. तसेच लोकांचे आरोग्य सुधारावे यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अधिक माहिती साठी वाचा - http://sudhirmungantiwar.blogspot.com