write.as

शेवटच्या‍ माणसाच्याि चेह-यावरील आनंद माझ्यादृष्टी‍ने अतिशय महत्वाईचा – सुधीर मुनगंटीवार/ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्याी अनुदानात वाढ करण्या्च्याद निर्णयाबद्दल वर्धा येथे सुधीर मुनगंटीवारांचा हृदय सत्कानर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेसाठी देण्यात येणा-या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मी अर्थसंकल्पात जाहीर केला त्याबद्दल वर्धा येथे माझ्या अभिनंदनाचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो लोकप्रतिनिधीत्वाच्या या 25 वर्षाच्या काळात आयोजित विविध कार्यक्रमांमधील माझ्यासाठी विशेष महत्वाचा कार्यक्रम आहे. दिन, दुर्बल, शोषीत, पिडीत, वृध्द, निराधार, दिव्यांग, विधवा, घटस्फोटीता, परित्यक्ता या आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या सेवेचा जो संकल्प आम्ही केला आहे त्या संकल्पाला माझ्या या बांधवांकडून मिळणा-या आशिर्वादाची शक्ती सदैव लाभेल, असा विश्वास व्यक्त करत या नागरिकांच्या पाठिशी शासन भक्कमपणे उभे राहिल अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दिनांक 23 जुन रोजी वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात भरीव वाढ केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनंदन तथा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे ,वर्धा विधानसभेचे आमदार डॉ. पंकज भोयर, वर्धा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, नगराध्यक्ष अतुल तराळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, वृध्द, निराधार, दिव्यांग, विधवा, घटस्फोटीता, परित्यक्ता यांना अर्थसहाय्य देण्यासाठी राबविण्यात येणा-या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांच्या अनुदानात रूपये 600 वरून 1000 रू. इतकी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्यांना दोन 2 अपत्ये आहेत त्यांना 1200 रूपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे वाढीव अनुदान ज्यावेळी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल तो क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण असेल. सदर योजनांच्या लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान अतिशय अल्प असून यात वाढ करावी ही मागणी मी 2009 पासून विधानसभेच्या माध्यमातुन शासनदरबारी रेटत आलो आहे. राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील विधवा भगिनींना देण्यात येणारे 10 हजार रूपयांचे अर्थसहाय्य वाढवून ते 20 हजार रूपये करण्यासाठी मी केंद्र शासनाच्या स्तरावर सतत पाठपुरावा करून त्यात यश मिळविले. महाराष्ट्रात चांदा ते बांदयापर्यंत सुमारे 35 लाख वृध्द, निराधार, विधवा, दिव्यांग नागरिक या योजनांचे लाभार्थी आहेत. त्यांना मिळणा-या अनुदानात वाढ झाल्यामुळे त्यांच्या चेह-यावर निर्माण होणारा आनंद माझ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. हे अनुदान 4-5 महिन्यापर्यंत थकीत राहत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून प्राप्त होतात. या विलंबाला जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाई करत यापूढे दर महिन्याच्या 1 तारखेला सदर अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी काटेकोर व्यवस्था शासन करणार असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. या अर्थसंकल्पात 80 टक्के दिव्यांग असलेल्या दिव्यांग बांधवांना शासनातर्फे घरकुल बांधून देण्याचा निर्णय आम्ही जाहीर केला आहे असे सांगत 80 टक्के दिव्यांगत्व असलेल्या बांधवांना हक्काचे घर मिळावे, निवारा मिळावा ही त्या मागील आपली भावना असल्याचे त्यांनी सांगीतले. विधवा महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करत स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी स्वयंरोजगाराची एक व्यापक योजना आपण जाहीर केली असून यासाठी 200 कोटी रू. निधी राखीव ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त विधवा भगिनींना सक्षम करण्यासाठी शासनाने हे पाऊल उचचले आहे. जात, धर्म, पंथाच्या भिंती बाजूला सारून विधवा भगिनीला आत्मनिर्भर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यांचा हक्काचा भाऊ म्हणून आपण खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभे राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. दिव्यांगांना स्वयंरोजगाराचे मोठे साधन म्हणून शॉप ऑन व्हेईकल उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दिव्यांग बांधवांना विविध प्रकारचे व्यवसाय सहजपणे करता यावे यासाठी त्यांना वाहनाच्या माध्यमातुन दुकान ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. दिन, दुर्बल, दिव्यांग, वृध्द, निराधार, विधवा या आर्थिकदृष्टया दुर्बलांच्या चेह-यावर आनंद निर्माण व्हावा, ते आत्मनिर्भर व्हावे, सक्षम व्हावे हा आपला संकल्प असून त्या संकल्पपूर्तीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com/p/blog-page_8.html