write.as

चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रालगतच्या गावांमधील शेतक-यांच्या नुकसानाची भरपाई महानिर्मीतीच्या सीएसआर च्या माध्यमातुन देण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

चंद्रपूर जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले गेल्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरांचे व शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे तातडीने सर्व्हेक्षण करून चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्राच्या सीएसआर निधीतुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांना दिले आहे.

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्रालगतच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरून शेतीचे, घरांचे, जनावरांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे त्वरीत सर्व्हेक्षण करून महानिर्मीती कंपनीच्या सीएसआर च्या माध्यमातुन चंद्रपूर महाऔष्णीक विद्युत केंद्राने आपदग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देशित केले आहे. अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com