write.as

मनपा, नगर परिषद, नगर पंचायतीमधील अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागु/ कर्मचारी संघटनांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मानले आभार

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती मधील अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाबद्दल आज भारतीय मजदुर संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. रामगोपाल मिश्रा व म्युनिसीपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष श्री. संतोष पवार यांनी अर्थमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले.

या निर्णयाचा लाभ राज्यातील 362 नगर परिषदा व नगर पंचायती तसेच 26 महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना तसेच निवृत्ती वेतन धारकांना होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अधिकारी व कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com