write.as

तुळशीवन वृंदावन उद्यान म्हणजे आनंदवन -अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

पंढरपूर दि. 25- : पंढरपूर अध्यामिक शक्ती आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला उर्जा व नवचैतन्य मिळते यासाठीच वन विभागाकडून तुळशी वृंदावन उद्यान विकसित करण्यात आले आहे. वृंदावनात आल्यानंतर प्रत्येकास कौटुंबिक आनंद मिळेल. त्यामुळे तुळशीवन वृंदावन म्हणजे आनंदवन आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन अणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत पंढरपूर येथे यमाई तलाव परिसरात विकसित करण्यात आलेल्या तुळशी वृंदावन उद्यानाचा लोकार्पण सोहळा वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. व्यासपीठावर पालकमंत्री विजय देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्या वन विभागामार्फत केवळ वृक्ष लागवड केली जात होती. वन विभागाने आता राज्यात उद्याने विकसित करण्याची कामे हाती घेतली आहेत. पंढरपूरच्या तुळशी वृंदावनाचे काम आव्हान समजून दर्जेदार व वेळेत पुर्ण केले आहे. वन विभागाने विकसित केलेले तुळशी वन पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी राज्य शासनामार्फत सुरु करण्यात आलेले नमामी चंद्रभागा अभियान एक मिशन असून अभियान सन 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी नदीत सांडपाणी मिसळू नये, यासाठी भीमा नदीच्या उगमापासून नदी स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी भीमा नदीकाठी असलेली शहरे, गावे, औद्यौगिक वसाहतींच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेकडील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी या महापालिकेस केंद्र सरकारकडून सुमारे 995 कोटी रुपये दिले आहेत.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, शासनाने निर्मल वारीसाठी अर्थसंकल्पात तीन कोटीचा विशेष निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. येथे होणारी विकासकामे गुणवत्तापुर्ण व दर्जेदार व्हावीत. नागरीकांना विकास कामे आपली वाटावीत अशा पध्दतीने कामाचे नियोजन केले जात आह.

प्रमुख वाऱ्यांसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि वारी नियोजनासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी, अभ्यागत यांच्यासाठी आणखी एका नवीन शासकीय विश्रामगृहासाठी निधी उपलब्ध केला जाईल. पंढरपूरला जोडणारे सर्व मार्ग राष्ट्रीय महामार्गास जोडले आहेत. यामुळे पंढरपूरात येणाऱ्या दिंड्या, पालख्या, वारकरी-भाविक यांची सोय झाली आहे. या मार्गावर नजीकच्या काळात वन विभागामार्फत दुतर्फा झाडे लावण्यात येतील, असे त्यांनी सांगितले

पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले, वन विभागाने विकसित केलेल्या तुळशी वृंदावनामुळे पंढरपूरच्या पर्यटन वैभवात भर पडली आहे. राज्य शासनाने जिल्ह्याच्या विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून जिल्हा विकास कामांच्या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे. विकास कामे करताना आणखी निधीची आवश्यकाता आहे. अक्कलकोटच्या विकास कामांसाठी 166 कोटी, जलसंपदा विभागाकडील कामांसाठी सुमारे 173 आणि सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडील कामांसाठी निधीची मागणी त्यांनी केली.

पंढरपुरात असलेले शासकीय विश्रामगृह अपुरे आहे, या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागेवर नवीन शासकीय वस्तीगुहास व संत चोखामेळा व दामाजीपंतांच्या स्मारकासाठी निधी मिळावा,अशी मागणी पालकमंत्री देशमुख यांनी केली.

पंढरपूरच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिल्याने पंढरपूर व तालुक्याचा विकास वेगाने होत आहे. जिल्हातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रांचा विकास पर्यटन स्थळे म्हणून विकसित करावीत, असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक केले संत चोखामेळा व दामाजीपंत यांची स्मारके लवकर व्हावीत यासाठी निधीची तरतूद व्हावी अशी मागणी आमदार भालके यांनी यावेळी केली.

तत्पूर्वी, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. संत एकनाथ पालखी मार्ग, मल्हारपेठ-मायनी, दिघंची, महूद-पंढरपूर या रस्त्याचे भूमिपूजन तर पंढरपूर नगरपालिकेमार्फत बांधण्यात आलेल्या विश्रमागृहाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com