write.as

संवेदशील गावांच्या वनसीमेवर प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्याचा शासनाचा निर्णय/ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेची पूर्तता.

डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत प्रायोगिक तत्वावर वनालगतच्या संवेदनशील गावांच्या वनसिमेंवर लोखंडी जाळयाचे कुंपण उभारण्याच्या निर्णय मंत्री मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2019-20 च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची पूर्तता झाली आहे.

महाराष्ट्रात वनविभागामार्फत वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने ठोस उपाययोजना करण्यात येत असल्यामुळे वन्यप्राण्यांना पुरेसे संरक्षण लाभलेले असून त्यांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. वाघ आणि बिबट या वन्यप्राण्याच्या प्रादुर्भावामुळे काही वनालगत असलेल्या गावांमध्ये अलीकडे वारंवार होत असलेल्या मनुष्यहानीच्या घटनांमुळे वनसीमेवर योग्य त्या ठिकाणी लोखंडी जाळीचे कुंपण उभारून देण्याबाबत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी मागणी करण्यात येत असल्यामुळे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून वनलगतच्या गावातील वनसीमेवर साखळी जाळीचे कुंपण घालण्याची घोषण करत यासाठी सन 2019-20 मध्ये 50 कोटी रू. नियतव्यय प्रस्तावित असल्याचे जाहीर केले. या घोषणेची पूर्तता झाली असून मनुष्यहानी व शेतपीक नुकसान टाळण्यासाठी वनालगत गावांच्या वनसीमेवर प्रायोगिक तत्वावर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे, ग्रामस्थांना पर्यायी रोजगाराची संधी वाढवून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे तसेच वनलगतच्या गावांमधील संसाधनांची उत्पादकता वाढविणे यासाठी सुरू करण्यात आलेल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या हा निर्णय वनालगतच्या गावातील वित्तहानी व मनुष्यहानी टाळण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानला जात आहे.
अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com