write.as

भारतरत्न अटलजींच्या प्रथम स्मृतिदिनानिमीत्त 16 ऑगस्ट रोजी गीत नया गाता हॅू या संगीत मैफिलीचे आयोजन* *पदमश्री पदमजा फेणाणी जोगळेकर देतील अटलजींच्या आठवणींना उजाळा* भारताचे माजी पंतप्रधान, कविमनाचे नेते, भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमीत्त दिनांक 16 ऑगस्ट रोजी सायं. 7.00 वा. प्रियदर्शिनी नाटयगृह चंद्रपूर येथे 'गीत नया गाता हॅू' या अटलजींच्या कवितांच्या सादरीकरणाचा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका पदमश्री पदमजा फेणाणी – जोगळेकर अटलजींच्या कविता सादर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहे. गेल्या वर्षी 16 ऑगस्ट रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. राष्ट्रभक्तीची प्रखर भावना जागविणा-या अनेक कविता अटलजींनी लिहील्या आहेत. गीत नया गाता हॅू या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पदमश्री पदमजा फेणाणी– जोगळेकर यांनी अटलजींच्या अनेक कविता स्वरबध्द केल्या आहेत. आपल्या सुमधुर आवाजात पदमजा फेणाणी या कविता सादर करणार आहे. यासह त्यांची प्रसिध्द भावगीते, चित्रपट गीते सुध्दा या संगीत मैफीलीत सादर होणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अटलजींच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्त आयोजित केलेल्या या संगीतमय कार्यक्रमाला चंद्रपूरकर नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहत त्यांना आदरांजली द्यावी, असे आवाहन भाजपा चंद्रपूर महानगर अध्यक्ष तथा आमदार नानाजी शामकुळे यांनी व भाजपा चंद्रपूर महानगर शाखेने केले आहे. http://sudhirmungantiwar.blogspot.com